‘कोल्हापुरी थाळी’ उपक्रमाने आदिल फरास यांचा वाढदिवस साजरा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सामाजिक कृतज्ञता सप्ताह
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोल्हापूर शहराध्यक्ष आणि महानगरपालिकेतील गटनेते मा. श्री. आदिल फरास यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात 'सामाजिक कृतज्ञता सप्ताह' मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या सप्ताहाचा मुख्य भाग म्हणून आज बुधवार, ६ मे रोजी कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गरजूंसाठी 'कोल्हापुरी थाळी' भोजन वाटपाचे विशेष आयोजन करण्यात आले होते.
वाढदिवसानिमित्त कोणताही बडेजाव किंवा शक्तीप्रदर्शन न करता, 'वाढदिवस सेवाकार्याचा' हा वारसा जपत सीपीआर चौक परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शहरातील शेकडो नागरिकांनी या कोल्हापुरी थाळीचा लाभ घेतला.
सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:
या उपक्रमाला शहरातील आजी-माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदिल फरास यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी:
नियाज खान, प्रकाश गवंडी, संदीप कवाळे, महेश सावंत, सुनील पाटील, प्रकाश कुंभार, युवराज साळोखे, नितीन मस्के, बजरंग देवकर, नागेश फरांडे, उमेश राऊत, तात्या साळोखे, दत्ता मोरे, पप्पू सावंत, संदीप कांबळे उपस्थित होते.
महिला पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग:
या उपक्रमात महिला आघाडीचा सहभाग लक्षणीय होता. यामध्ये पूजा साळोखे, सायली भोसले, सोनाली कवींदकर, शितल तिवडे, अलका वाघेला, ज्योती चव्हाण, अंजना सावर्डेकर यांच्यासह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
