rr
आढावा बैठक - आमदार अमल महाडिक
पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामांना गती द्या!
आमदार अमल महाडिक यांचे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला निर्देश
महत्वाची आढावा बैठक
कोल्हापूर | ता. ०६ मे २०२६
आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची व्यापक आढावा बैठक घेतली. पावसाळ्यापूर्वी शहरातील पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
बैठकीतील महत्त्वाचे निर्देश:
विशेष घोषणा आणि लक्षवेधी मुद्दे:
- ✅ एक चौक स्वनिधीतून सुशोभित करणार.
- ✅ शेंडा पार्क 'वैद्यकीय नगरी'साठी स्वतंत्र आराखडा.
- ✅ तावडे हॉटेल उड्डाणपुलासाठी पाठपुरावा.
- ✅ पर्यटकांसाठी वर्दळीच्या ठिकाणी शौचालयांची सोय.
- ✅ पंचगंगा स्मशानभूमीसाठी स्वतंत्र निधी.
- ✅ सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करणार.
प्रदूषण आणि स्वच्छता:
पंचगंगा नदी आणि रंकाळा प्रदूषणासंदर्भात पावसाळ्यापूर्वी ठोस उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. तसेच पावसाळ्यात खुदाईची कामे कटाक्षाने टाळण्याचे निर्देशही आमदार महाडिक यांनी दिले आहेत.
बैठकीस उपस्थित:
रमेश मस्कर (शहर अभियंता)
हर्षजित घाटगे (जल अभियंता)
सर्व सहाय्यक आयुक्त
आरोग्य अधिकारी
विभाग प्रमुख
