जनगणना २०२७: प्रशिक्षण शिबिराचा टप्पा पूर्ण
कोल्हापूर महानगरपालिका - नियोजित आणि सज्ज!
जनगणना २०२७ करिता कोल्हापूर शहरासाठी एकूण १२०६ ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत घरगणना करण्यात येणार असून, यासाठी महापालिका यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.
प्रशिक्षण सत्रांचा तपशील
आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी प्रगणक आणि पर्यवेक्षक यांनी प्रत्यक्ष परिसरातील घरांना भेट देऊन कामकाजाचे प्रात्यक्षिक घेतले. न्यु पॅलेस येथील छत्रपती शाहू विद्यालय व सानेगुरूजी वसाहतमधील देशमुख हायस्कूल येथे हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.
नागरिकांसाठी विशेष आवाहन: स्वयंगणना (Self Enumeration)
नागरिकांना १ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वतःची माहिती ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
येथे क्लिक करून स्वयंगणना करापोर्टल: https://se.census.gov.in
उपस्थित अधिकारी:
परितोश कंकाळ (उपायुक्त), उज्वला शिंदे, स्वाती दूधाने, जयवंत जावडेकर, डॉ. विजय पाटील (सहा. आयुक्त), महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवार पोवार (उपशहर अभियंता), सागर कांबळे (अधिक्षक), युवराज जबडे, विक्रमसिंह लाड, प्रकाश माने, धनंजय माने व इतर कर्मचारी.
प्रसिद्धी: Newss कट्टा डिजिटल कोल्हापूर
