BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

महापौर जनता दरबार: नागरिकांच्या समस्यांवर फुंकर

महापौर जनता दरबार - कोल्हापूर महानगरपालिका

महापौर जनता दरबार: नागरिकांच्या समस्यांवर फुंकर

महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या उपस्थितीत ७६ तक्रारींचे निवारण

दर महिन्याच्या ५ तारखेचा उपक्रम कोल्हापूर | ता. ०५

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी व त्यांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या ‘जनता दरबारात’ आज ७६ नागरिकांनी आपले अर्ज दाखल केले.

हा जनता दरबार महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे पार पडला. प्रारंभी महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली.

विभागनिहाय प्राप्त अर्जांचा तपशील

नगररचना २०
पाणी पुरवठा ११
सहाय्यक आयुक्त कार्यालय १०
विभागीय कार्यालय १
शहर अभियंता कार्यालय
घरफाळा विभाग
इस्टेट विभाग
उद्यान विभाग
आरोग्य विभाग
विभागीय कार्यालय २
अतिक्रमण विभाग
सामान्य प्रशासन
विभागीय कार्यालय ३
अपंग/दिव्यांग विभाग
परवाना विभाग

महत्वाचे: प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या कडक सूचना महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

उपस्थित मान्यवर:

विशाल शिराळे (स्थायी समिती सभापती), रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर (अतिरिक्त आयुक्त), आदिल फरास (गटनेते), स्वरुप कदम, माधुरी व्हटकर, अर्चना कोराणे, रेखा उगवे, किरणकुमार धनवाडे, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, रमेश मस्कर, हर्षजीत घाटगे, सुनील बिद्री, सुधाकर चल्लावाड, मनीष रणभिसे व इतर सर्व विभागप्रमुख.

Newss कट्टा डिजिटल
थोडे नवीन जरा जुने