BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांची झूम प्रकल्पास भेट

स्थायी समिती - झूम प्रकल्प भेट

स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांची झूम प्रकल्पास भेट

कसबा बावडा कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी व भविष्यातील नियोजनाबाबत चर्चा

विशेष पाहणी दौरा कोल्हापूर | ता. ०५

स्थायी समिती सभापती विशाल शिराळे व समितीच्या सदस्यांनी सोमवारी सायंकाळी ४.०० वाजता कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पा भेट देऊन पाहणी केली.

महत्वाचे अपडेट्स
  • 📍 बायोगॅस प्रकल्प: ३० TPD आणि २० TPD बायोगॅस प्रकल्पांची पाहणी करून कार्यान्वित यंत्रणेची माहिती घेतली.
  • CNG प्रकल्प: भविष्यात निर्माण होणाऱ्या बायोगॅसद्वारे CNG प्रकल्प उभारून महापालिकेच्या टिप्परना इंधन पुरवठा करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

सध्या याठिकाणी टिपींग फ्लोअर येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे निदर्शनास आले. यावरून सभापतींनी प्रकल्प ठिकाणी प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि ठेकेदाराला कचऱ्यावर प्रक्रिया जलद गतीने करण्याच्या कडक सूचना दिल्या.

तसेच आर.डी.एफ. देण्यासाठी जास्तीत जास्त गाड्या पाठविण्याच्या आणि बायोमायनिंग फेज-२ चे काम जलदगतीने पूर्ण करून कचरा कमी करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. कचऱ्याचे योग्य विलगीकरण करण्यावरही भर देण्यात आला.


यावेळी उपस्थित मान्यवर:
आदिल फरास (सदस्य)
अभिजीत मोकाशी (सदस्य)
जयवंत पवार (मुख्य आरोग्य निरीक्षक)
हेमंत काशीद (शहर समन्वयक)
मनोज लोट (आरोग्य निरीक्षक)
नियाज अत्तार (प्रकल्प व्यवस्थापक)
थोडे नवीन जरा जुने