BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

राजारामपुरीत महापालिकेची धडक कारवाई

Newss कट्टा - कोल्हापूर महापालिका कारवाई

राजारामपुरीत महापालिकेची धडक कारवाई

७ हातगाड्या जप्त, अनधिकृत शेड्स हटवले | कोल्हापूर महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये

LIVE UPDATES कोल्हापूर | ता. ०५

कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. ३ (राजारामपुरी) व अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज राजारामपुरी पहिली गल्ली परिसरात धडक कारवाई करत खाऊच्या गाड्या हटवून परिसर मोकळा केला.

🚀 ७ हातगाड्या जप्त
🏢 ४ अनधिकृत शेड्स जमीनदोस्त
🧱 ४ अनधिकृत कट्टे तोडले

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दुपारी राजारामपुरी जनता बाजार खाऊ गल्ली परिसराला अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा, फूटपाथवर तसेच सामासिक अंतरामध्ये करण्यात आलेले बांधकाम, सार्वजनिक जागेत उभारलेल्या टपऱ्या, खोकी व अन्य अतिक्रमणे केली असल्याचे निदर्शनास आले.

"पार्किंगसाठी राखीव जागेत कोणतेही अतिक्रमण होऊ नये, व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढावे, अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल." - डॉ. राजेंद्र भारुड (आयुक्त)

या कारवाईवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा. आयुक्त जयंत जावडेकर उपस्थित होते. ही मोहीम उपशहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत आणि विभागीय कार्यालय क्र.३ च्या पथकाने यशस्वी केली.

पुढील इशारा: शहरातील अनधिकृत फेरीवाले आणि रस्त्यावर बाहेर काढलेल्या शेड्सवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रसिद्धी: Newss कट्टा डिजिटल

थोडे नवीन जरा जुने