BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

नाना-नानी पार्क अभ्यासिकेत शुल्काचा घोळ?; दिपाली घाटगे यांच्या प्रश्नांनी उघड केला घोटाळा?

नाना-नानी पार्क अभ्यासिका घोटाळा? - विशेष वृत्त
घोटाळा उघड?

नाना-नानी पार्क अभ्यासिकेत शुल्काचा घोळ?; दिपाली घाटगे यांच्या प्रश्नांनी उघड केला घोटाळा?


कोल्हापूर
विशेष बातमी

कोल्हापूर : नगरसेविका दिपाली घाटगे यांनी त्यांच्या प्रभागातील नाना-नानी पार्क परिसरातील अभ्यासिका व वाचनालयाच्या कामकाजासंदर्भात गंभीर मुद्दा उपस्थित करत शुल्क व आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप केला. महानगरपालिकेच्या सभेत हा विषय उपस्थित करत त्यांनी संबंधित व्यवस्थापनावर कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा केला.

नियमांची पायमल्ली आणि अवाजवी शुल्क

घाटगे यांनी सांगितले की, एमपीएससी (MPSC) आणि यूपीएससी (UPSC) सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेसाठी करारानुसार विनामूल्य अथवा अत्यल्प शुल्क आकारण्याची अट आहे.

अपेक्षित शुल्क ₹ २००
प्रत्यक्षात आकारणी ₹ ५५० / महा
(+ ₹१०० डिपॉझिट)

याशिवाय, संबंधित अभ्यासिकेच्या उत्पन्नातून १० टक्के रक्कम महानगरपालिकेला जमा करणे बंधनकारक असतानाही त्या ठिकाणी महानगरपालिकेचा अधिकृत बोर्ड नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

संबंधित व्यवस्थापनाकडून जवळपास चार लाख रुपयांहून अधिक उत्पन्न होत असतानाही महानगरपालिकेकडे केवळ १९ हजार रुपये जमा करण्यात आल्याची पावती आपल्या ताब्यात असल्याचा दावा घाटगे यांनी सभागृहात केला.

महापौरांचे कडक कारवाईचे निर्देश

या आरोपांनंतर सभागृहात जोरदार चर्चा झाली. प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौर रूपाराणी निकम यांनी प्रशासनाला चौकशी करून संबंधितांवर आठ दिवसांच्या आत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणामुळे अभ्यासिका व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थी व पालकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.

महापालिका लाईव्ह न्यूज अपडेट

© 2026 | सर्व माहिती दिलेल्या वृत्तानुसार जशीच्या तशी प्रसिद्ध केली आहे.
थोडे नवीन जरा जुने