BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन; "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू" मोहीम रणशिंग!

पर्यावरण विशेष | जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन
पर्यावरण विशेष मोहीम कोल्हापूर

जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन; "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू" मोहीम रणशिंग!

World Environment Day 2026

कोल्हापूर : जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत तसेच पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने दिनांक १ ते ५ जून २०२६ या कालावधीत "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू" ही विशेष मोहीम ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू" मोहिमेमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांनी केले आहे.

यावर्षीची मुख्य संकल्पना व ध्येय:

यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना हवामान कृती (Climate Action) अशी असून Mission LiFE (Lifestyle for Environment) अंतर्गत पर्यावरणपूरक जीवन शैलीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक मंडळे, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (4Rs):
Refuse Reduce Reuse Recycle
ग्रे-वॉटर व्यवस्थापन (3Rs):
Reuse Reduce Recharge

कचऱ्यापासून संपत्ती (Waste to Wealth), परिपत्र अर्थव्यवस्था (Circular Economy), किचन गार्डन, वृक्षारोपण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यासारख्या विषयांवर विशेष भर दिला जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ व जनजागृती

१ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ संदर्भात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार असून Bulk Waste Generators (BWGs) यांची ओळख, कचऱ्याचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण, जुने कचरा डेपो नोंदणी, घराघरातून कचरा संकलन यासंदर्भात विशेष मोहिम राबविण्यात येतील.

मोहिमेंतर्गत राबविले जाणारे प्रमुख उपक्रम:

घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत जनजागृती
ग्रामपंचायत स्तरावरील प्रकल्पांची पाहणी व मूल्यमापन
"माझे गाव, माझी जबाबदारी" जनसहभाग उपक्रम
मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांची (BWGs) ओळख
प्रभात फेरी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन
नुक्कड नाटके आणि ग्रामस्तरावर स्वच्छता मोहीम
"एक पेड़ माँ के नाम" अंतर्गत भव्य वृक्षारोपण अभियान व विशेष ग्रामसभा

५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष ग्रामसभेमध्ये मोहिमेतील कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व हवामान कृतीबाबत ग्रामस्थांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत सर्व गट विकास अधिकारी व ग्रामपंचायतींना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी दिल्या असून, मोहिमेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती SBM(G)-IMIS पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद कोल्हापूर (स्वच्छ भारत मिशन ग्रामीण)
जून २०२६
थोडे नवीन जरा जुने