BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

बारावी निकाल: कोल्हापूर विभागाचा निकाल ८९.९७ टक्के; निकालात मुलींचीच सरशी

HSC Result 2026 - Digital Newss कट्टा

बारावी निकाल: कोल्हापूर विभागाचा निकाल ८९.९७ टक्के; निकालात मुलींचीच सरशी

कोल्हापूर | प्रतिनिधी | Digital Newss कट्टा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी (HSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये कोल्हापूर विभागात यंदा ८९.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांच्या तुलनेत तब्बल ९.२९ टक्क्यांनी अधिक आहे.

राज्यात कोकण विभाग अव्वल, लातूर तळाला

राज्याचा विचार करता, कोकण विभागाने ९४.१४ टक्के निकालासह आपले प्रथम स्थान कायम राखले आहे. कोल्हापूर विभाग राज्याच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. विभागांच्या क्रमवारीनुसार पुणे दुसऱ्या, अमरावती तिसऱ्या, नाशिक चौथ्या, मुंबई पाचव्या तर छत्रपती संभाजीनगर सातव्या, नागपूर आठव्या आणि लातूर विभाग नवव्या (८४.१४%) स्थानावर राहिला.

ड्रोन आणि सीसीटीव्हीची करडी नजर: यंदा परीक्षा केंद्रांवर पहिल्यांदाच ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात आली होती. यामुळे गैरप्रकारांना मोठ्या प्रमाणावर आळा बसला.

निकालात घट, पण गुणवत्तेत वाढ

निकालाची टक्केवारी काही प्रमाणात घटली असली तरी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढल्याचा विश्वास कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी व्यक्त केला. कॉपीमुक्त वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या कष्टाचे वास्तविक प्रतिबिंब निकालातून दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेला सहाय्यक सचिव गजानन उकिरडे, लेखाधिकारी प्रणती जमदग्नी, वरिष्ठ अध्यक्ष दीपक पोवार, मनोज शिंदे आणि पर्यवेक्षक सुनील नलवडे उपस्थित होते.

कोल्हापूर विभाग निकाल

८९.९७%

(गतवर्षीच्या तुलनेत ३.६७% घट)

निकाल विश्लेषण (मुले vs मुली)

मुलींची ९.२९ टक्क्यांनी आघाडी!

पुढील प्रक्रिया:
  • ✅ गुणपडताळणी ऑनलाइन अर्ज सुरू
  • ✅ श्रेणी सुधार योजना (CIS)
  • ✅ पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक लवकरच
थोडे नवीन जरा जुने