BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

मतदार यादीतून नावे वगळल्याचा काँग्रेसचा आरोप

मतदार जागृती | सतेज पाटील

मतदार यादीतून नावे वगळल्याचा काँग्रेसचा आरोप

सतेज पाटील यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर

महाराष्ट्र मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) प्रक्रियेला सुरुवात झाली असून, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोळ होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केला आहे. १२ राज्यांमध्ये सुमारे ५.२ कोटी नागरिकांची नावे कोणतीही पूर्वसूचना न देता मतदार यादीतून वगळण्यात आली असून, महाराष्ट्रातही अशा प्रकारची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र मतदारांचे नाव वगळले जाऊ नये, यासाठी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे.

नागरिकांचे अस्तित्व धोक्यात?

सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की, मतदार यादी सुधारण्याच्या नावाखाली प्रशासनाकडून पारदर्शकतेचा अभाव दिसत आहे. नागरिकांना पुन्हा एकदा स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.


'सर्च इंजिन'द्वारे मदतीचा हात

अनेक नागरिकांना आपला बीएलओ (BLO) कोण आहे याची माहिती नसते. ही अडचण ओळखून काँग्रेस पक्षाने एक विशेष सर्च इंजिन विकसित केले आहे. नागरिकांनी आपल्या नावाच्या खात्रीसाठी खालील लिंकचा वापर करावा:

मतदार यादीत नाव तपासा

क्यूआर कोड स्कॅन करून नाव तपासा

मिस्ड कॉलवर मिळणार खात्री

मतदारांच्या सोयीसाठी ९६७२५९९९९० हा विशेष क्रमांक जारी करण्यात आला आहे.

९६७२५९९९९० या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आपले नाव मतदार यादीत 'मॅप' झाले आहे की नाही, याची खात्री करा.

जिल्ह्यातील एकाही योग्य मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही, यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

थोडे नवीन जरा जुने