BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

मलकापूर ते बाजार भोगाव ST बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी निवेदन

ST बससेवा निवेदन
ताजी बातमी

मलकापूर ते बाजार भोगाव ST बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी निवेदन

मलकापूर ते बाजार भोगाव या मार्गावरील एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या स्नेहल केतन वेल्हाळ यांनी एसटी प्रशासनाकडे निवेदन सादर केले. अनेक वर्षांपासून या मार्गावरील बससेवा बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या बससेवेअभावी विद्यार्थी, महिला, कामगार तसेच सर्वसामान्य प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून आर्थिक व वेळेचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची असल्याने ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या सोयीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असे स्नेहल वेल्हाळ यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने