BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा देशात डंका; 'एज्युकेशन वर्ल्ड' रँकिंगमध्ये नऊवा क्रमांक

DYP University Ranking News

कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा देशात डंका; 'एज्युकेशन वर्ल्ड' रँकिंगमध्ये नऊवा क्रमांक

कोल्हापूर:

येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक उत्कृष्टतेचा ठसा पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर उमटवला आहे. 'एज्युकेशन वर्ल्ड इंडिया हायर एज्युकेशन रँकिंग २०२६-२७' मध्ये या विद्यापीठाने देशात ९ वा (India Rank 9), तर महाराष्ट्र राज्यात तिसरा (Maharashtra Rank 3) क्रमांक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विशेषतः 'खासगी मेडिकल आणि हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी' या श्रेणीमध्ये विद्यापीठाने हे यश मिळवले आहे.

देशात रँक: ९ वा
महाराष्ट्रात रँक: ३ रा

नवी दिल्ली येथे आयोजित एका भव्य 'ग्रँड अवॉर्ड सेरेमनी' मध्ये विद्यापीठाचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले आणि मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.

"हे यश विद्यापीठाच्या संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. भविष्यात ग्लोबल लेव्हल रेकग्निशन मिळवण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न राईल."
- डॉ. संजय डी. पाटील (कुलपती)

या प्रतिष्ठित रँकिंगसाठी देशभरातील २१०० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने शैक्षणिक गुणवत्ता (Academic Quality), संशोधन (Research), पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा (Holistic Development) सखोल अभ्यास करण्यात आला होता.

या कार्यक्रमादरम्यान आयोजित परिषदेत देश-विदेशातील तज्ज्ञांनी Higher Education Trends, Medical Education Innovation, आणि International Collaboration या विषयांवरही महत्त्वपूर्ण चर्चा केली. या यशामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून विद्यापीठाच्या सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि स्टाफचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

थोडे नवीन जरा जुने