BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

PRSI, कोल्हापूर चॅप्टरकडून निमंत्रण व नोंदणी

National PR Day - PRSI Kolhapur

राष्ट्रीय जनसंपर्क दिवस

PRSI, कोल्हापूर चॅप्टरकडून निमंत्रण व नोंदणी

सस्नेह नमस्कार..!!


२१ एप्रिल हा राष्ट्रीय जनसंपर्क दिवस म्हणून साजरा केला जातो. पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) ही जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्था असून देशभरात त्यांचे अनेक चॅप्टर आहेत. राज्यात मुंबई, नागपूरनंतर कोल्हापुर चॅप्टर नुकतेच जाहीर झाले आहे.

कोल्हापुर चॅप्टरकडून राष्ट्रीय जनसंपर्क दिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर चॅप्टरचे उद्घाटन कार्यक्रम व PR Meet चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जनसंपर्क/माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांच्याशी संवाद साधण्याची, अनुभवाचे आदानप्रदान करण्याची संधी जनसंपर्क-जाहिरात प्रतिनिधी, पत्रकार, माध्यम क्षेत्रातील विद्यार्थी यांना उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाचा तपशील
  • दिनांक: २१ एप्रिल २०२६
  • वेळ: सकाळी १०.३० वाजता
  • विषय: ‘जनसंपर्क लोकशाहीचा पाचवा स्तंभ’
स्थळ

संख्याशास्त्र विभागाचे सभागृह,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

*सहभागींना प्रमाणपत्र व अल्पोपहारची व्यवस्था असेल.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्याकरता खालील लिंकवर नोंदणी करणे अनिवार्य आहे:

येथे नोंदणी करा (Registration Link)
थोडे नवीन जरा जुने