BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

१ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा मोफत

मोठी बातमी! १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा मोफत

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात मोठी घोषणा

कोल्हापूर | दि. १७ एप्रिल २०२६

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या १ जूनपासून राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज येथे केली.

महत्त्वाचे मुद्दे:
  • ✓ खासगी कंत्राटदारांमार्फत चालवली जाणारी व्यवस्था बंद होणार.
  • ✓ महामंडळ स्वतः स्वच्छतेची जबाबदारी घेणार.
  • ✓ दर ४ तासांनी स्वच्छता करणे अनिवार्य.
  • ✓ ३० रुपयांत चहा-नाश्ता योजना सक्तीची.

प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो, त्यामुळे आता हा निधी महामंडळ स्वतः खर्च करणार आहे. मंत्र्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छता गृह, उपाहारगृह, हिरकणी कक्ष आणि प्रवासी कक्षांची बारकाईने पाहणी केली.

थोडे नवीन जरा जुने