BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

शीर्षक नाही

प्रभाग समिती निवड

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर, ता. 17 : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 च्या सभापतीपदी अनुक्रमे वैभव अविनाश कुंभार, अनुराधा सचिन खेडकर, संजय मोहिते व विशाल शिवाजी चव्हाण यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. प्रभाग समिती क्रमांक 1 गांधी मैदान, क्रमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केट, क्रमांक 3 राजारामपुरी जगदाळे हॉल आणि क्रमांक 4 छ. ताराराणी मार्केट या विभागीय कार्यालयांसाठी सभापती पदाकरिता प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.

बैठकीच्या प्रारंभी विभागीय कार्यालयनिहाय सभा अध्यक्षांनी अर्जांची छाननी करून सर्व अर्ज वैध असल्याचे घोषित केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. मात्र, एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने सर्व चारही उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

निवडीनंतर उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, महापौर सौ. रुपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, उपसभापती सौ. दिपा ठाणेकर, गटनेते मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते शारंगधर देशमुख, आदील फरास, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसचिव सुनिल बिद्रे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

थोडे नवीन जरा जुने