BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी

उष्माघात जनजागृती - कोल्हापूर महानगरपालिका

उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी

कोल्हापूर महानगरपालिका - सार्वजनिक आरोग्य विभाग

उष्माघात म्हणजे काय?

मार्च ते जून या कालावधीत उष्माघाताचा धोका वाढत असून सध्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हात दीर्घकाळ काम करणे, कारखान्यांतील उष्ण वातावरणात काम करणे, बंद व उष्ण खोलीत राहणे तसेच घट्ट कपडे परिधान करणे ही उष्माघाताची प्रमुख कारणे आहेत.

प्रमुख लक्षणे

त्वचा लालसर होणे / सूज ताप व डोकेदुखी स्नायूंमध्ये गोळे येणे अत्यधिक घाम येणे थकवा व चक्कर येणे उलट्या होणे नाडी वेगाने धडकणे अर्धबेशुद्ध अवस्था

✅ काय करावे (प्रतिबंधात्मक उपाय):

  • भरपूर पाणी प्या.
  • हलक्या व फिकट रंगाचे सैल कपडे वापरा.
  • उन्हात जाताना टोपी, गॉगल किंवा छत्रीचा वापर करा.
  • घर थंड ठेवण्यासाठी पंखा, कुलर किंवा ओलसर पडदे वापरा.
  • पाळीव प्राण्यांनाही सावलीत ठेवा.
  • रुग्ण आढळल्यास त्याला सावलीत हलवून थंड पाण्याने अंग पुसा.

❌ काय टाळावे:

  • दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर पडणे टाळावे.
  • श्रमाची किंवा कष्टाची कामे करू नका.
  • लहान मुलांना पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका.
  • गडद व घट्ट कपडे वापरणे टाळावे.
  • मद्य, चहा, कॉफी आणि शीतपेये यांचे सेवन टाळावे.

👨‍⚕️ तातडीची मदत

उष्माघाताची लक्षणे दिसल्यास विलंब न करता जवळच्या महापालिकेच्या **प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, वॉर्ड दवाखाना किंवा आरोग्यवर्धिनी केंद्राशी** त्वरित संपर्क साधावा.

© २०२४ कोल्हापूर महानगरपालिका | आरोग्य विभाग
थोडे नवीन जरा जुने