BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

जिल्हाधिकाऱ्यांकडून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा

तीर्थक्षेत्र विकास आढावा बैठक

जिल्हाधिकाऱ्यांकडून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा

श्री जोतिबा व श्री अंबाबाई देवस्थान विकास प्रकल्पांना गती

कोल्हापूर, दि. १६ (जिमाका)

📍 बैठकीचा गोषवारा

जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात ऑनलाईन माध्यमातून दोन्ही महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख सूचना:
  • विकास आराखड्यांतर्गत होणारी कामे अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत.
  • सुरू असलेल्या कामांमध्ये स्थानिक लोकांना विश्वासात घेण्यात यावे.
  • जोतिबा मंदिर परिसरातील अतिक्रमण आणि रस्त्यांची कनेक्टिव्हिटी यावर बारकाईने लक्ष द्यावे.
महत्त्वपूर्ण अपडेट्स:

निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी १६ मे पासून जनगणनेचे काम सुरू होणार असल्याने, तत्पूर्वी अंबाबाई देवस्थान परिसरातील जागांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच, प्रांताधिकारी श्रीमती बर्डे-चौगुले यांनी भूसंपादनाबाबत दोन बैठका पूर्ण झाल्याची माहिती दिली.

👥 उपस्थित अधिकारी

विजय राठोड (जिल्हाधिकारी)
गजानन गुरव (निवासी उपजिल्हाधिकारी)
मोसमी बर्डे-चौगुले (प्रांताधिकारी)
विक्रम देशमुख (जिल्हा नियोजन अधिकारी)
शिवराज नाईकवडे (देवस्थान समिती)
विलास वाहणे (पुरातत्व विभाग)
रमेश मस्कर (शहर अभियंता)
रेवा पेठे (आर्किटेक्ट)
सूचना

येत्या १६ मे पूर्वी अंबाबाई देवस्थान परिसरातील सर्वेक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

माहिती व जनसंपर्क विभाग, कोल्हापूर

थोडे नवीन जरा जुने