BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

वेताळमाळ तालमीची बालगोपालवर मात; उपांत्य फेरीत धडक

सतेज चषक फुटबॉल स्पर्धा - बातमी

सतेज चषक फुटबॉल स्पर्धा

वेताळमाळ तालीम
१ - ०
बालगोपाल तालीम

वेताळमाळ संघ उपांत्य फेरीत!

वेताळमाळ तालमीची बालगोपालवर मात; उपांत्य फेरीत धडक

पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात चुरशीचा सामना झाला. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या मात्र गोल करता आले नाही.

वेताळमाळ संघाच्या रेहान मुजावरच्या फ्री किक वर आकाश माळीने मारलेला फटका गोलपोस्ट जवळून गेला. तर बालगोपाल संघाच्या दोन संधी वाया गेल्या. मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

महत्त्वाचा क्षण: उत्तरार्धात सामन्याच्या ४९ व्या मिनिटाला वेताळमाळ संघाच्या राहुल पाटील याने मैदानी गोल करत वेताळमाळ संघास १ गोलची आघाडी मिळवून दिली.

यानंतर बालगोपालकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या. मात्र वेताळमाळ संघाच्या बचावफळीने त्या परतवून लावल्या. उत्तरार्धातही बालगोपालच्या दोन संधी वाया गेल्या. संपूर्ण वेळेत बालगोपाल संघाला गोल करता न आल्याने हा सामना वेताळमाळ तालमीने १ विरुद्ध ० गोलने जिंकला.


वेताळमाळ उत्कृष्ट खेळाडू:
शोएब बागवान सर्वेश वाडकर आकाश माळी आकाश मोरे
बालगोपाल उत्कृष्ट खेळाडू:
फेला ऋतुराज पाटील अभिनव साळोखे रोहित कुरणे देवराज मंडलिक
उद्याचा सामना

खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ
वेळ: दुपारी ४ वाजता

थोडे नवीन जरा जुने