महानगरपालिका प्रशासन अपडेट
कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आयुक्त ॲक्शन मोडमध्ये
नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून शहरातील विविध प्रकल्पांची पाहणी
कोल्हापूर महानगरपालिकेचे नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज शहरातील महापालिकेच्या विविध सुरू असलेल्या प्रकल्पांची पाहणी करून कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या पाहणी दौऱ्यात त्यांनी शहराचा विकास आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला कडक निर्देश दिले.
पार्किंग प्रकल्प
गोकुळ हॉटेल शेजारील मल्टीलेव्हल पार्किंग आणि सरस्वती टॉकीज परिसरातील पार्किंगची उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करून निविदा प्रक्रिया राबवण्याच्या सूचना.
अतिक्रमण मोहीम
व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश. ज्या ठिकाणी स्थगिती नाही, तिथे तातडीने कारवाई करण्याचे आदेश.
वारसा स्थळे व सांस्कृतिक
केशवराव भोसले नाट्यगृह आणि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचा आढावा घेऊन उद्घाटनाचे नियोजन करण्याच्या सूचना.
रंकाळा तलाव
उत्पन्न वाढीसाठी फिशिंग आणि बोटिंग महसुलाबाबत माहिती घेतली. ऐतिहासिक माहिती फलक बसवण्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी इस्टेट विभागाला कडक सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या रिक्त जागांवर तातडीने मालकी हक्काचे फलक लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच सीएसआरच्या (CSR) माध्यमातून उद्यानांची देखभाल व दुरुस्ती करण्यावर भर देण्याचे सांगितले.
उपस्थित अधिकारी:
अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, शहर अभियंता रमेश मस्कर, शहर रचनाकार एन.एस. पाटील, आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्यासह सर्व प्रमुख विभाग प्रमुख उपस्थित होते.