BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

के.एस.बी.पी. पार्क परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

अतिक्रमण कारवाई - कोल्हापूर

के.एस.बी.पी. पार्क परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

कोल्हापूर | ता. ०९

कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं. ३ राजारामपुरी व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज के.एस.बी.पी. पार्क परिसर या ठिकाणी कडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक घटकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

जप्त करण्यात आलेले साहित्य:
  • २ लोखंडी अँगल
  • १ टेबल
  • २ हातगाड्या
  • ४ काऊंटर आणि इतर साहित्य

विशेष: कारवाई दरम्यान १९ हातगाडी मालकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली.

सोमवारी झालेल्या जनता दरबारामध्ये अतिक्रमणाबाबत तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाच्या अनुषंगाने व महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेने ही कारवाई पूर्ण केली. या मोहिमेसाठी १ जेसीबी, २ ट्रॅक्टर ट्रॉली व १ डंपरचा वापर करण्यात आला.

प्रशासकीय उपस्थिती:

सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा. आयुक्त जयंत जावडेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात उप-शहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. ३ मधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने