BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

सतेज चषक फुटबॉल: खंडोबा तालीम मंडळाचा 'फाइव्ह स्टार' विजय

सतेज चषक फुटबॉल बातमी
सतेज चषक फुटबॉल: खंडोबा तालीम मंडळाचा 'फाइव्ह स्टार' विजय

कोल्हापूर : प्रतिनिधी

येथील ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळाने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. वेगवान चढाया आणि अचूक पासिंगच्या जोरावर खंडोबा संघाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा ५-० अशा मोठ्या गोलफरकाने धुव्वा उडवत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच खंडोबाच्या खेळाडूंनी आक्रमक धोरण स्वीकारल्याने प्रतिस्पर्धी बचावफळीची अक्षरशः दाणादाण उडाली. सामन्याचा पहिला गोल २६ व्या मिनिटाला पाहायला मिळाला, जेव्हा प्रथमेश गावडेने दिलेल्या सुरेख पासचा फायदा उठवत विष्णू मनीकंदम याने चेंडू जाळीत धाडला.

या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच, तीन मिनिटांत म्हणजेच २९ व्या मिनिटाला कुणाल दळवीने दिलेल्या पासवर प्रतापने गोल करत संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. पूर्वार्धात हीच आघाडी कायम राहिली.

उत्तरार्धात ४४ व्या मिनिटाला विष्णू मनीकंदमच्या पासवर रोहित जाधवने तिसरा गोल नोंदवला. खेळाच्या ५५ व्या मिनिटाला सचिन एस. च्या पासवर पृथ्वीराज साळोखे याने चौथा गोल करून खंडोबाचा विजय जवळपास निश्चित केला. अखेरीस ६३ व्या मिनिटाला विष्णू मनीकंदमने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा पाचवा 'मैदानी गोल' झळकावून विजयावर शिक्कामोर्तब केले.

खंडोबाकडून गोलकीपर आयुष्य चौधरी, आदित्य लायकर, ओंकार लायकर यांनी भक्कम बचाव केला, तर संयुक्त जुना बुधवार पेठच्या मयूर सुतार, प्रथमेश जाधव, सचिन मोरे, आदित्य माने, शुभम जाधव आणि संकेत कांबळे यांनीही झुंजार खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली.

© २०२६ सतेज चषक अपडेट्स

थोडे नवीन जरा जुने