दिलबहार ३ - २ फुलेवाडी
उपांत्य फेरीत धडक!सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात दिलबहार तालीम विजयी; फुलेवाडीचे आव्हान संपुष्टात
पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात रोमहर्षक सामना झाला.
फुलेवाडीकडून गोलची परतफेड करण्यासाठी आक्रमक खेळ करण्यात आला, मात्र २६ व्या मिनिटाला दिलबहारच्या प्रथम भोसले ने दुसरा गोल करत आघाडी २-० केली. ३८ व्या मिनिटाला पुन्हा स्वयम् साळोखेने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला. लगेचच ३९ व्या मिनिटाला फुलेवाडीच्या सत्यम पाटील ने गोल करत १ गोलने आघाडी कमी केली. मध्यंतरापर्यंत धावसंख्या ३-१ अशी होती.
उत्तरार्धात फुलेवाडीने जोरदार चढाया केल्या मात्र दिलबहारच्या बचावफळीने त्या परतवून लावल्या. सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना फुलेवाडीच्या सत्यम पाटीलने दुसरा गोल करत सामना ३-२ अशा स्थितीत आणला. मात्र, शेवटपर्यंत ही आघाडी टिकवून ठेवत दिलबहारने विजय निश्चित केला.
स्टार परफॉर्मर्स (दिलबहार)
- माणिक पाटील, फेबिन
- संकेत वेसणेकर, स्वयम् साळोखे
लढवय्ये खेळाडू (फुलेवाडी)
- मारुती कोळी, अक्षय पाटील
- सिद्धार्थ पाटील, अक्षय मंडलिक