BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

शहरातील नाले सफाईमधून २५ डंपर गाळ उठाव

कोल्हापूर नाले सफाई मोहीम - News Katta
पावसाळा पूर्व तयारी

शहरातील नाले सफाईमधून २५ डंपर गाळ उठाव

कोल्हापूर | बुधवार, २२ एप्रिल २०२६

कोल्हापूर : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते.

यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले आहे. या नाले सफाईमधून आज अखेर २५ डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे.

यंत्रणेद्वारे सफाई:
यंदा महापालिकेच्या २ पोकलँन्ड मशीन मार्फत शहरातील कत्यानी कॉम्प्लेक्स ते नेहरुनगर, लक्ष्मीपूरी रिलायन्स मॉल मागे प्लॅस्टिक मटेरियल व गाळ काढण्याचे काम सुरु आहे.

सफाईचा सविस्तर अहवाल:

महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये ५० कर्मचाऱ्यांमार्फत व जेसीबीच्या सहाय्याने ४७६ नाल्यापैकी १३० लहान नाले व २० मध्यम नाले व चॅनलची सफाई करण्यात येत आहे.

या १३० भागांतील नाले सफाई पूर्ण:
क्रांतिसिंह नाना पाटीलनगर बापूराम नगर सुर्वेनगर साळोखेनगर मोहिते कॉलनी हडको कॉलनी राजेंद्रनगर संपूर्ण परिसर हॉकी स्टेडियम परिसर लक्ष्मीपूरी कोंबडी बझार राजारामपूरी जनता बझार चौक साईस एक्सटेशन जाधववाडी कपूर वसाहत शिवराज कॉलनी कारंडे मळा कदमवाडी जाधववाडी रोड भोसलेमळा साळोखेमळा सरदेसाई पाणंद बुध्दविहार समाज कल्याण ऑफिस

प्रसिद्धी: News Katta Digital Services

थोडे नवीन जरा जुने