BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभ

मिलेट व फळ महोत्सव - News Katta
खास कोल्हापूरकरांसाठी

कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभ

पांढरे जांभूळ, १८ जातींचे आंबे आणि मिलेटचे १० प्रकार एकाच छताखाली!

कोल्हापूर, दि. २२ (जिमाका)

📍 ठिकाण: भारत हाऊसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी

📅 कालावधी: २२ ते २६ एप्रिल २०२६ | 🕙 वेळ: सकाळी ९ ते रात्री ९

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स व त्याचे पदार्थ, तसेच विविध फळांची विक्री होण्याच्या उद्देशाने कृषी पणन मंडळामार्फत भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

प्रमुख उपस्थिती:
नीलकंठ करे (जिल्हा उपनिबंधक) जालिंदर पांगारे (जिल्हा कृषी अधिकारी) डॉ. सुभाष घुले (पणन मंडळ) हिंदकेसरी दीनानाथ सिंह
महोत्सवाची वैशिष्ट्ये:
  • राज्यातील ११ जिल्ह्यांतून शेतकरी सहभागी.
  • एकूण ४५ विविध स्टॉल्स उपलब्ध.
  • आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू यांसह दुर्मिळ पांढरे जांभूळ.
  • शेतकरी विजय मोरे यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या विविध १८ जाती.

याप्रसंगी बोलताना श्री. मास्तोळी यांनी आंबा उत्पादकांना मोठे व्यासपीठ मिळावे यासाठी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरही अशा आयोजनाची गरज व्यक्त केली. डॉ. सुभाष घुले यांनी हा महोत्सव कृषी पणन मंडळाचा 'रौप्य महोत्सव' असल्याचे सांगून थेट विक्रीमुळे शेतकऱ्यांच्या दर्जेदार उत्पन्नाला बाजारपेठ मिळत असल्याचे नमूद केले.

प्रकाशन व सत्कार:

मान्यवरांच्या हस्ते "पौष्टिक तृणधान्य पाककृती" पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रगतशील शेतकरी विजय मोरे आणि प्रसिद्ध रांगोळीकार शिवाजी जेऊरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

🍎 आरोग्य संवाद: २३ तारखेपासून डॉ. संदीप पाटील, डॉ. अहिल्या वाघमोडे, डॉ. योगेश बन व डॉ. प्रतिभा ठोंबरे या आहारतज्ज्ञांची 'मिलेटचे महत्त्व' यावर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

या कार्यक्रमाचे आभार सुयोग टकले यांनी मानले. यावेळी बबनराव रानगे, दत्ताजीराव वारके यांच्यासह अनेक प्रयोगशील शेतकरी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने