BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

घरफाळा करात ३० जूनपर्यंत ६ टक्के सवलत

घरफाळा सवलत योजना २०२६ - News Katta
Kolhapur Property Tax
६% सवलत

घरफाळा करात ३० जूनपर्यंत ६ टक्के सवलत

कोल्हापूर | बुधवार, २२ एप्रिल २०२६


कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी देयके तयार करण्यात आली आहेत. चालू वर्षाच्या मागणीवर ६ टक्के सवलत योजना लागू करण्यात आली असून शहरातील सर्व मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. ही सवलत दि. ३० जून २०२६ पर्यंतच लागू राहणार आहे.

कर कसा भरावा?
  • महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात जाऊन करदाता क्रमांक सांगून चालू वर्षाचा घरफाळा भरावा.
  • गूगल पे (Google Pay), फोन पे (PhonePe), पेटीएम (Paytm) यांसारख्या डिजिटल माध्यमांद्वारे भरणा शक्य.
  • नागरी सुविधा केंद्रांमध्ये किओस्क मशीनद्वारे ऑनलाइन भरणा करता येईल.
  • यंदाच्या देयकांवर क्यूआर कोड (QR Code) छापण्यात आलेला आहे, ज्याद्वारे सुलभ पेमेंट करता येईल.

ऑनलाईन पध्दतीने कराचा भरणा करण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही घरफाळा भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

तरी मिळकतधारकांनी विलंब न करता घरफाळा भरून ६ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

बातमी सौजन्य: News Katta Digital Services

थोडे नवीन जरा जुने