BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापूर हादरले! घरगुती वादातून जन्मदात्या बापानेच मुलाला संपवले; विक्रमनगरमधील धक्कादायक घटना

कोल्हापूर क्राईम न्यूज | डिजिटल न्यूज कट्टा
कोल्हापूर हादरले! घरगुती वादातून जन्मदात्या बापानेच मुलाला संपवले; विक्रमनगरमधील धक्कादायक घटना
कोल्हापूर

दारूच्या नशेत रोज घरात शिवीगाळ करणाऱ्या मुलाच्या जाचाला कंटाळून पित्यानेच पोटच्या मुलाचा चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना कोल्हापूरमधील विक्रमनगर परिसरात घडली आहे. जुनेद गफूर पठाण (वय २०) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित पिता गफूर सुलतान पठाण (वय ४०, रा. स्वामी समर्थनगर) याला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमनगर येथील स्वामी समर्थ कॉलनी परिसरात गफूर पठाण हे आपल्या पत्नी, दोन मुले आणि वृद्ध आईसह राहतात. गफूर पठाण हे चिकनच्या दुकानात कामाला जातात, तर त्यांचा मुलगा जुनेद हा भंगाराच्या दुकानात काम करत होता. जुनेदला दारूचे व्यसन होते. तो दररोज दारू पिऊन घरी यायचा आणि घरातील व्यक्तींना विनाकारण शिवीगाळ करून भांडण उकरून काढायचा. त्याच्या या सततच्या त्रासामुळे संपूर्ण कुटुंब हतबल झाले होते.

सोमवारी रात्री जुनेद पुन्हा दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने नेहमीप्रमाणे वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी वादाचे पर्यावसान टोकाचा संघर्ष झाला आणि संतापलेल्या गफूर पठाण यांनी जुनेदवर चाकूने हल्ला केला.

अपघाताचा बनाव रचला, पण...

जुनेद रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर वडिलांनीच त्याला रिक्षातून उपचारासाठी सीपीआर (CPR) रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलिसांनी विचारणा केली असता, जुनेद मिरवणुकीत गेला होता आणि तिथे तो जखमी झाल्याची खोटी माहिती वडिलांनी दिली. मात्र, मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास उपचारादरम्यान जुनेदचा मृत्यू झाला.

पोलिसी खाक्या दाखवताच दिली कबुली

जुनेदच्या छातीवर झालेली जखम ही कोणत्याही अपघातातील नसून ती धारदार शस्त्राने झालेली असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत स्पष्ट झाले. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडगर आणि सहाय्यक निरीक्षक रणजित पाटील यांनी कुटुंबीयांकडे कसून चौकशी सुरू केली. वडिलांच्या जबाबात वारंवार विसंगती येत असल्याने पोलिसांनी खाक्या दाखवताच, गफूर पठाण यांनी मुलाच्या त्रासाला कंटाळून आपणच त्याला चाकूने भोसकल्याची कबुली दिली.

या घटनेमुळे विक्रमनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जन्मदात्या वडिलांनीच मुलाचा काटा काढल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

डिजिटल न्यूज कट्टा - अजय शिंगे | कोल्हापूर
थोडे नवीन जरा जुने