BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

वाढत्या उन्हाळ्यात भाविकांना दिलासा; अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात देवस्थान समितीची विशेष व्यवस्था

Ambabai & Jotiba Temple Management News

वाढत्या उन्हाळ्यात भाविकांना दिलासा; अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात देवस्थान समितीची विशेष व्यवस्था

कोल्हापूर: प्रतिनिधी एप्रिल २०२६

करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग जोतिबा मंदिरात सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. यावर्षी उन्हाचा कडाका प्रचंड असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने विशेष 'थंडावा' देणारे नियोजन करण्यात आले आहे.

प्रशासकीय माहिती
या सर्व उपाययोजनांची सविस्तर माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी दिली आहे.

उन्हावर मात करण्यासाठी 'थंडावा' नियोजन

सचिव शिवराज नाईकवडे यांनी सांगितले की, वाढत्या तापमानाचा विचार करून भाविकांना उन्हापासून वाचवण्यासाठी मंदिर परिसरात विविध ठिकाणी विशेष 'मॅटिंग' टाकण्यात आले आहे. जमिनीची उष्णता कमी करण्यासाठी आणि भाविकांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून उष्णतारोधक पांढरे पट्टे मारण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. यासोबतच भाविकांसाठी शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी सोय करण्यात आली आहे.

मर्यादित जागेतही सोयीसुविधांवर भर

सध्या दोन्ही मंदिरांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या संवर्धन योजनेअंतर्गत आणि पुरातत्व विभागामार्फत जतनाची कामे सुरू आहेत. या कामासाठी क्रेन आणि ट्रॉलीची सातत्याने ये-जा सुरू असते, त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात कायमस्वरूपी मंडप उभारणे तांत्रिकदृष्ट्या शक्य झालेले नाही. मात्र, जिथे जिथे जागा उपलब्ध आहे आणि जिथे तांत्रिक अडचण नाही, अशा सर्व ठिकाणी प्रशासनाने मंडप उभारले आहेत. या मंडपांमध्ये उकाड्यापासून बचाव करण्यासाठी पंखे आणि कुलरची व्यवस्था करण्यात आली असल्याचे नाईकवडे यांनी नमूद केले.

मॅटिंग आणि पांढरे पट्टे
अनवाणी चालणाऱ्या भाविकांसाठी जमिनीवर विशेष कोटिंग आणि मॅट्सची व्यवस्था.
पंखे आणि कुलर
जिथे मंडप शक्य आहेत, तिथे भाविकांना उकाड्यापासून वाचवण्यासाठी कुलिंग सिस्टीम.
पाण्याची सोय
पिण्याच्या पाण्याचे अतिरिक्त पॉईंट्स कार्यान्वित करून शुद्ध पाण्याचे नियोजन.
संवर्धन कामे
पुरातत्व विभागाच्या कामांमुळे असलेल्या अडथळ्यातही सुसज्ज आणि सुरक्षित नियोजन.
भाविकांना प्रशासनाचे आवाहन:

हवामान खात्याने दिलेल्या उष्णतेच्या लाटेच्या (Heat Wave) इशाऱ्यांनुसार भाविकांनी आपल्या प्रवासाचे आणि दर्शनाचे नियोजन करावे. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीचा विचार करून कडाक्याच्या उन्हाची वेळ टाळून योग्य वेळेतच दर्शनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

थोडे नवीन जरा जुने