BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात ७१ नागरिकांचे अर्ज दाखल

कोल्हापूर स्थानिक

महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात ७१ नागरिकांचे अर्ज दाखल

कोल्हापूर | सोमवार, ६ एप्रिल २०२६

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी आयोजित केलेल्या 'जनता दरबारात' आज ७१ तक्रारींचे अर्ज प्राप्त झाले.

दर महिन्याच्या ५ तारखेला आयोजित होणारा हा जनता दरबार काल रविवार असल्याने आज, ६ एप्रिल रोजी महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापौरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मागील कामाचा आढावा:
  • मागील जनता दरबारात एकूण १३८ तक्रारी आल्या होत्या.
  • त्यापैकी १०२ तक्रारींचे यशस्वी निराकरण करण्यात आले आहे.
  • उर्वरित तक्रारी न्यायप्रविष्ठ किंवा कौटुंबिक वादातील आहेत.

अतिक्रमण करणाऱ्यांना १५ दिवसांचा अल्टिमेटम

शहराच्या प्रगतीमध्ये 'अतिक्रमण' हा अडथळा असून तो गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे महापौरांनी नमूद केले. रंकाळा तलावाशेजारील १७ गाड्यांच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, "असे अतिक्रमण शहरात यापुढे चालणार नाही. कोणत्याही चुकीच्या अतिक्रमणात लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करणार नाहीत." नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून न घेतल्यास १५ दिवसांनंतर शहरात मोठी मोहीम राबवली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

विभागनिहाय प्राप्त अर्जांचा तपशील (एकूण ७१):

विभाग अर्ज संख्या विभाग अर्ज संख्या
नगररचना विभाग२२उद्यान विभाग
शहर अभियंता कार्यालयसामान्य प्रशासन
घरफाळा विभागअतिक्रमण विभाग
पाणी पुरवठाआस्थापना विभाग
आरोग्य विभागइस्टेट विभाग
रचना व कार्यपद्धतीआरोग्य प्रशासन
परवाना विभागKMT विभाग
शिक्षण विभागएकूण अर्ज: ७१

यावेळी उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने