BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

बालगोपाल आणि खंडोबा तालीम मंडळाचा दिमाखदार विजय; पुढील फेरीत प्रवेश

सतेज चषक फुटबॉल स्पर्धा

बालगोपाल आणि खंडोबा तालीम मंडळाचा दिमाखदार विजय; पुढील फेरीत प्रवेश

कोल्हापूर | सोमवार, ६ एप्रिल २०२६

पाटाकडील तालीम मंडळ आयोजित 'सतेज चषक' फुटबॉल स्पर्धेत आज बालगोपाल तालीम मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ या बलाढ्य संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला.

बालगोपाल विरुद्ध सम्राटनगर: थरारक संघर्ष

आज बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात अटीतटीचा सामना झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी आक्रमक चढाया केल्या, मात्र मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य (०-०) बरोबरीत राहिला.

उत्तरार्धातील घडामोडी:

  • ४५ वे मिनिट: सम्राटनगरच्या अंशींल बागवान याने गोल करत संघाला १-० ची आघाडी मिळवून दिली.
  • ६५ वे मिनिट: सम्राटनगरच्या अभिषेक सिंग याने गोल करत ही आघाडी २-० अशी भक्कम केली.
  • ७५ वे मिनिट: बालगोपालच्या देवराज मंडलिक याने गोल करत पिछाडी कमी केली.
  • ८० वे मिनिट: बालगोपालच्या फेला याने गोल करत सामना २-२ अशा बरोबरीत आणला.
ट्रायब्रेकरचा निकाल:

निर्धारित वेळेत सामना २-२ बरोबरीत राहिल्याने निकाल ट्रायब्रेकरवर घेण्यात आला.

बालगोपाल (अचूक गोल): रोहित कुरणे, देवराज मंडलिक, मुस्तफा फरास, विश्वविजय घोरपडे, प्रवण गायकवाड.

सम्राटनगर (अचूक गोल): कर्णिक जाधव, सचिन सुतार, कुणाल माने, अंशील बागवान. (लवप्रीतसिंग याचा फटका वाया गेला).

निकाल: बालगोपाल ५-४ अशा गोल फरकाने विजयी!


खंडोबा तालीमचा एकतर्फी विजय

दुपारच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने वर्षा विश्वास तरुण मंडळाचा ७ विरुद्ध ० अशा मोठ्या गोल फरकाने दणदणीत पराभव करत आपली ताकद दाखवून दिली.

उद्याचे वेळापत्रक (७ एप्रिल):

दुपारी १:३० वाजता संयुक्त जुना बुधवार पेठ
विरुद्ध
सुभाषनगर फुटबॉल क्लब
दुपारी ४:०० वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ
विरुद्ध
फुलेवाडी क्रीडा मंडळ
थोडे नवीन जरा जुने