BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

पाटाकडील तालीम मंडळाचा रंकाळ्यावर सहा गोल्सनी मोठा विजय

सतेज चषक फुटबॉल बातमी

सतेज चषक फुटबॉल: पाटाकडील तालीम मंडळाचा रंकाळ्यावर सहा गोल्सनी मोठा विजय

ऋषिकेश मेथे-पाटीलची हॅट्ट्रिक; दुसऱ्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाची संध्यामठवर मात

कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज रोमांचक लढती पाहायला मिळाल्या.

पाटाकडील तालीम मंडळ (PTM) 6 - 0 रंकाळा तालीम मंडळ

पीटीएमने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत रंकाळ्याचा धुव्वा उडवला. पूर्वार्धात संघ २-० अशा आघाडीवर होता.

गोल नोंदवणारे खेळाडू (PTM):
  • १६ मि.: नबी खानच्या पासवर प्रथमेश हेरेकर
  • ३३ मि.: प्रथमेश हेरेकरच्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटील
  • ५७ मि.: रोहित पवारच्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटील
  • ६५ मि.: ओमकार मोरे (मैदानी गोल)
  • ७८ मि.: रोहित पवारच्या पासवर प्रथमेश हेरेकर
  • ७९ मि.: ऋषिकेश मेथे-पाटील (हॅट्ट्रिक पूर्ण)
ठळक वैशिष्ट्ये:

उत्कृष्ट खेळाडू (PTM): अमीन कझीर, नबी खान, अक्षय पायमल, रोहित मंडलिक.

झुंजार खेळ (रंकाळा): सोहम निकम, अमित जाधव, सूरज भाटे, विवेक पाटील, साई कदम, स्वप्नील वाईकर.

सामनावीर: ऋषिकेश मेथे-पाटील (PTM)

गोलकीपर शरद मेढे (रंकाळा) याने रोहित मंडलिकचा फ्री-किकवरील उत्कृष्ट फटका अडवला.

दिलबहार तालीम मंडळ 3 - 0 संध्यामठ

गोल: थांगजलेन (३० मि. आणि ८३ मि.), संकेत वेसनेकर (४२ मि.)

दिलबहार खेळाडू: स्वयम गिरजे, स्वयम साळोखे, माणिक पाटील, गंधर्व घाटगे, जयकुमार मेथे.

संध्यामठ खेळाडू: आशिष पाटील, सुलतान शेख, पृथ्वीराज साळोखे, चिन्मय पाटील, कारणसिंह पाटील.

उद्याचे सामने (सोमवार):
  1. खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध वर्षा विश्वास
  2. बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर
थोडे नवीन जरा जुने