BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

सतेज चषक - वेताळमाळचा ऐतिहासिक विजय

सतेज चषक - वेताळमाळचा ऐतिहासिक विजय
विशेष बातमी

सतेज चषक फुटबॉलवर वेताळमाळचे नाव; 'ट्राय ब्रेकर'मध्ये दिलबहारचा पाडाव

कोल्हापूरचा महामुकाबला: वेताळमाळ तालीम मंडळाचा थरारक विजय

कोल्हापूर: प्रतिनिधी दिनांक: १५ एप्रिल, २०२६

पाटाकडील तालीम मंडळ आयोजित प्रतिष्ठेच्या 'सतेज चषक' फुटबॉल स्पर्धेच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळाचा ट्राय ब्रेकरमध्ये पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.

छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगलेल्या या महामुकाबल्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमक चढाया केल्या. मात्र, भक्कम बचावफळीमुळे मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोलचे खाते उघडता आले नाही. मध्यंतराच्या सत्रात आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.

उत्तरार्धात खेळाचा वेग अधिकच वाढला. सामन्याच्या ७८ व्या मिनिटाला दिलबहारला मिळालेल्या सुवर्णसंधीचे सोने करत फेबिनने पेनल्टीवर गोल केला आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. विजयाकडे झुकलेल्या दिलबहारच्या गोटात उत्साहाचे वातावरण असतानाच, शेवटच्या काही मिनिटांत वेताळमाळच्या आकाश माळीने प्रेक्षणीय गोल नोंदवत सामना १-१ अशा बरोबरीत आणला.

निकाल: निर्धारित वेळेत सामना १-१ असा सुटल्याने अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये वेताळमाळने ३-१ ने बाजी मारली.

वेताळमाळकडून पार्थ मोहिते, जय कामत आणि प्रणव कणसे यांनी अचूक नेम धरत गोल केले. याचवेळी वेताळमाळचा गोलरक्षक विशाल कुरणे याने भिंत बनून दिलबहारच्या चढाया रोखल्या, ज्यामुळे वेताळमाळने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

बक्षीस वितरण

  • विजेता (वेताळमाळ) ₹ २ लाख + चषक
  • उपविजेता (दिलबहार) ₹ १ लाख + चषक

वैयक्तिक पुरस्कार

मालिकावीर (बुलेट): पार्थ मोहिते

उत्कृष्ट गोलकीपर: विशाल कुरणे (वेताळमाळ)

उत्कृष्ट फॉरवर्ड: आकाश माळी (वेताळमाळ)

उत्कृष्ट डिफेन्स: एन. के. (दिलबहार)

उत्कृष्ट हाफ: फेबिन (दिलबहार)

© 2026 News Katta Digital Services | कोल्हापूर

थोडे नवीन जरा जुने