BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर रिक्षा भाड्यावरून राडा; महिलेचा संताप अनावर

कोल्हापूर: प्रतिनिधी
कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षा भाड्याच्या कारणावरून एका महिलेने रिक्षाचालकाला भररस्त्यात चांगलेच धारेवर धरल्याची घटना घडली आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, शहरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर संबंधित महिला आणि एका रिक्षाचालकामध्ये भाड्याच्या रकमेवरून शाब्दिक चकमक उडाली. रिक्षाचालकाने जादा भाडे मागितल्याचा आरोप करत महिलेने संताप व्यक्त केला. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार वाद झाला, ज्यामुळे परिसरातील प्रवाशांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
बसस्थानक परिसरात रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अडवणूक होण्याच्या तक्रारी वारंवार येत असतात. त्यातच आता या 'हायव्होल्टेज' ड्राम्याचा व्हिडिओ समोर आल्याने रिक्षा भाड्याच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी अधिकृत तक्रार झाली नसली, तरी सोशल मीडियावर मात्र प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि रिक्षा भाड्याच्या मनमानीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

थोडे नवीन जरा जुने