BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

प्रस्तावित आय.टी.पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नांव देवून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात

कोल्हापूर आय.टी. पार्क अपडेट
विशेष मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नांव देवून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात

आमदार राजेश क्षीरसागर यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आग्रही मागणी

कोल्हापूर | दि. २५ एप्रिल २०२६

प्रदीर्घ कालावधीच्या मागणीनंतर कोल्हापूरला आय.टी.पार्क स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल. आय.टी.पार्क कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या विकासात मैलाजा दगड ठरणार असून, या आय.टी.पार्कच्या माध्यमातून छत्रपती ताराराणी यांच्या शौर्याला, स्मृतींना उजाळा मिळावा या उद्देशाने करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या नगरीमध्ये स्थापिल्या जात असलेल्या आय.टी.पार्कचे “करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी आय.टी.पार्क” असे नामकरण करावे, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.

उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांचा आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह येथे सत्कार केला.

आय.टी. हबसाठी अत्याधुनिक सुविधांची मागणी:

शेंडा पार्क येथील ३४.३६ हेक्टर जागेत हे पार्क होत असताना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून खालील State of the Art Infrastructure सुविधा मिळणे आवश्यक आहे:

'झिरो-डिग' युटिलिटी ट्रॅचेस (Plug & Play)
ग्लोबल IT CFC व AR/VR Labs
डार्क फायबर कॉरिडॉर व प्रायव्हेट 6G टेस्टबेड
ग्लोबल IP आणि पेटंट डेस्क
१००% 'झिरो कार्बन' ग्रीन बिल्डिंग्स
समर्पित एक्सप्रेस फीडर व सबस्टेशन
२४ तास पाणीपुरवठा (GSR/ESR)
जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र
STPI मार्फत मजबूत इंटरनेट सेवा
ऐतिहासिक साजेसे सजावटीचे प्रवेशद्वार

कोल्हापूर हे सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसह सीमाभागाचा केंद्रबिंदू असल्याने या भागातील युवकांना त्याचा उपयोग व्हावा. मोठमोठ्या कंपन्यांनी याठिकाणी गुंतवणूक करावी याकरिता 'मित्र' संस्थेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन आ. क्षीरसागर यांनी दिले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी उद्योग विभागाचे आभार मानले.

शिवसेनेतील निष्ठावंतांना न्याय द्यावा

"कोल्हापुरात १९८६ पासूनचे शिवसैनिक निस्वार्थीपणे काम करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर कोल्हापूर शहराने सर्वप्रथम खंबीर पाठिंबा दिला. अनेक संकटे आणि मोर्चे झेलूनही शिवसैनिक डगमगले नाहीत. अशा निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना विविध समित्या, महामंडळे आणि पदांच्या माध्यमातून न्याय द्यावा," अशी आग्रही मागणी आ. राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केली.

© २०२६ डिजिटल Newss कट्टा | कोल्हापूर

थोडे नवीन जरा जुने