BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापूर महानगरपालिका: स्थायी समिती सभेत राडा; असंसदीय शब्दांच्या वापरावरून सभापती संतप्त

कोल्हापूर मनपा स्थायी समिती बातमी
LIVE UPDATE

कोल्हापूर महानगरपालिका: स्थायी समिती सभेत राडा; असंसदीय शब्दांच्या वापरावरून सभापती संतप्त

कोल्हापूर | प्रतिनिधी

कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत अभूतपूर्व गदारोळ पाहायला मिळाला. नागरिकांच्या समस्या आणि शहराच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण सभेत, विरोधी सदस्यांनी असंसदीय शब्दांचा वापर केल्याने सभापतींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

लोककल्याणासाठी एकत्र येणाऱ्या सदस्यांकडून असे गैरवर्तन घडणे दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बैठकांचे सत्र आणि सभेला झालेला उशीर

स्थायी समितीची ही बैठक मुळात सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्याच वेळी खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या संदर्भात तातडीची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि सर्व गटनेते उपस्थित असल्याने स्थायी समितीच्या सभेला उशीर झाला. त्यानंतर पुन्हा रंगकर्मी आणि कंत्राटदारांसोबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली दुसरी बैठक पार पडली. या सलगच्या बैठकांमुळे स्थायी समितीची वेळ बदलून ती दुपारी ४:३० वाजता निश्चित करण्यात आली.

वाद नेमका कशामुळे झाला?

सभेमध्ये केवळ चार मुख्य विषय होते, ज्यावर सर्वांची मते जाणून घेऊन प्रशासनाने ठोस निर्णय घेतले होते. सायंकाळी ७:१५ वाजेपर्यंत सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सुरू होती. मात्र, सभेच्या शेवटी विरोधी सदस्य सोनवणे यांनी रस्त्यावरील दिव्यांचा (लाईट) एक वैयक्तिक स्वरूपाचा प्रश्न उपस्थित केला.

वेळ झाल्यामुळे आणि महिला सदस्यांच्या सोयीचा विचार करून सभापतींनी 'सभा संपली' असे जाहीर करत, सदर प्रश्न 'पुढच्या सभेत घेऊ' अशी विनंती केली. मात्र, संबंधित सदस्याने हट्ट धरत महिला सदस्यांच्या उपस्थितीत अपशब्द आणि द्विअर्थी असंसदीय शब्दांचा वापर केला. यामुळे सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला.

'इमारतीचे आखाड्यात रूपांतर करू नका'

या प्रकारानंतर सभापतींनी सदस्यांना शहर विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. "नागरिकांच्या कचरा, पाणी आणि रस्त्यांच्या समस्या सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे. महानगरपालिकेचे उत्पन्न कसे वाढेल, यावर धोरणात्मक चर्चा होणे गरजेचे आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका इमारतीचे 'आखाड्यात' रूपांतर होत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, जर सदस्यांनी शहर विकासाचे भान ठेवले, तर असे प्रकार टाळता येतील.

समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप फेटाळला

विरोधी सदस्यांसोबत समन्वय कमी पडत असल्याचा आरोप सभापतींनी फेटाळून लावला. आतापर्यंत झालेल्या ७-८ सभांपैकी केवळ दोनच सभांमध्ये वादाचे प्रसंग आले आहेत. मागील एका सभेतही प्रशासनाचे विषय केवळ वाचून दाखवण्यास विरोधकांनी हरकत घेतली होती. पुढील काळात सर्व सभा सुरळीत पार पडतील, असा आशावाद त्यांनी शेवटी व्यक्त केला.

थोडे नवीन जरा जुने