BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

व्हीनस कॉर्नरवर बेकायदेशीर पार्किंगवर वाहतूक पोलिसांचा बडगा; महिला पोलीस यांचा ‘ॲक्शन मोड

Digital News Katta - News Update
Live News

व्हीनस कॉर्नरवर बेकायदेशीर पार्किंगवर वाहतूक पोलिसांचा बडगा; महिला पोलीस यांचा ‘ॲक्शन मोड’

कोल्हापूर : प्रतिनिधी

शहरातील अत्यंत गजबजलेल्या व्हीनस कॉर्नर परिसरातील वाहतूक कोंडी आणि बेकायदेशीर पार्किंगच्या समस्येवर आज कोल्हापूर शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई केली. यावेळी कर्तव्यदक्ष महिला पोलीस स्नेहल यांनी निडरपणे आणि संयमाने परिस्थिती हाताळत नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना चांगलाच धडा शिकवला.

व्हीनस कॉर्नर परिसरात अनेक व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या समोर रस्त्यावरच बेकायदेशीरपणे वाहने उभी केली जातात. यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. या तक्रारीची दखल घेत आज स्नेहल यांनी या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी काही वाहनधारकांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी अत्यंत नम्रपणे पण ठामपणे संबंधितांना कायद्याची जाणीव करून दिली.

"रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग होऊ देऊ नका, अन्यथा नियम तोडणाऱ्यांसह संबंधितांवरही कठोर कारवाई केली जाईल," अशी सक्त ताकीद (Warning) यावेळी व्यवसायधारकांच्या सुरक्षारक्षकांना देण्यात आली.

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक (PI) मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. एका कॉलवर कारवाईसाठी तत्पर राहणारे पीआय मोरे आणि स्नेहल यांच्यासारखे निडर अधिकारी पोलीस दलात असतील, तर कोल्हापूरच्या वाहतुकीचे चित्र नक्कीच बदलेल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


© Digital News Katta
थोडे नवीन जरा जुने