BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

दिव्यांग भवनाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

दिव्यांग भवन निर्णय - कोल्हापूर न्यूज
कोल्हापूर | ता. २३

दिव्यांग भवनाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

महापौर सौ. रुपाराणी निकम यांचे मोठे आश्वासन

शहरातील प्रस्तावित दिव्यांग भवनाबाबत स्थानिक नागरिकांच्या विरोधाची दखल घेत लवकरच सकारात्मक व सर्वांना मान्य होईल असा निर्णय घेतला जाईल.

महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे सायंकाळी आयोजित बैठकीत दिव्यांग बांधव व स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेताना महापौर सौ. रुपाराणी निकम बोलत होत्या. प्रारंभी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी मंगळवार पेठेतील मंजूर जागेवर दिव्यांग भवनासाठी खुदाई करण्यात आली होती, मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे काम तात्पुरते स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती दिली.


दिव्यांग बांधवांची मागणी

मंजूर जागेवरच भवन उभारण्याची एकमुखी मागणी केली. या ठिकाणी कोणताही वाद नसून नियोजित ठिकाणीच काम सुरू करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

स्थानिक नागरिकांची मागणी

दिव्यांग भवनास विरोध नाही, मात्र निवासी भागाजवळील जागेऐवजी शासन नियमानुसार आवश्यक असलेल्या एक एकर जागेमध्ये भवन बांधावे.

"स्थानिक नागरिकांच्या अडचणींची मी स्वतः पाहणी करणार आहे. नियमांनुसारच दिव्यांग भवन उभारले जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेऊ."
- महापौर रुपाराणी निकम

यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, गटनेता आदिल फरास, नगरसेवक अमर समर्थ, विजयसिंह खाडे-पाटील, नगरसेविका सौ.जयश्री चव्हाण, सौ. माधुरी नकाते यांनी आपल्या भूमिका मांडल्या.

बैठकीस उपस्थित मान्यवर:

महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उप-आयुक्त परितोष कंकाळ, नगरसेवक संजय मोहिमे, अमर समर्थ, प्रतापसिंह जाधव, विशाल चव्हाण, प्रविण सोनवणे, नगरसेविका सौ.पुर्वा राणे, सौ.निलांबरी साळोखे, सौ.प्राजक्ता जाधव, माजी नगरसेवक किरण नकाते, भूपाल शेटे, विविध संघटनेचे दिव्यांग बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने