BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

मानसी लोळगे यांच्या पाठपुराव्याला यश

News Katta - मानसी लोळगे यांच्या पाठपुराव्याला यश

नगरसेविका मानसी लोळगे यांच्या पाठपुराव्याला यश; हॉकी स्टेडियम ते कळंबा जेल मार्गावर गतीरोधक बसवणार

कोल्हापूर: प्रतिनिधी

हॉकी स्टेडियम चौक ते कळंबा जेल या नूतनीकरण झालेल्या मार्गावर वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका लक्षात घेऊन, येथे गतीरोधक बसवण्यासाठी नगरसेविका अॅड. मानसी सतीश लोळगे यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून, महानगरपालिकेला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हॉकी स्टेडियम ते कळंबा जेल हा रस्ता नवा झाल्यापासून वाहनांचा वेग अनियंत्रित झाला होता. यामुळे स्थानिक नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब गांभीर्याने घेत अॅड. मानसी लोळगे यांनी या मार्गावर तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्यात यावेत, अशी मागणी प्रशासनाकडे लावून धरली होती.

या मागणीची दखल घेत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सकारात्मक अभिप्राय दिला आहे. या मार्गावरील खालील महत्त्वाच्या ठिकाणी गतीरोधक किंवा रंबलर्स बसवणे लोकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे वाहतूक पोलिसांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे:

  • बालाजी पार्क
  • शाहू कॉलनी चौक
  • रामानंद पूल
  • निर्मिती चौक
  • आनंद प्राईड अपार्टमेंट

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या या संमतीमुळे आता या मार्गावरील अपघातांच्या धोक्याला लगाम बसणार आहे. 'भारतीय रस्ते काँग्रेस'च्या (IRC) नियमावलीनुसार महानगरपालिकेने या ठिकाणी तातडीने गतीरोधक उभारावेत, अशा हालचाली आता प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. नगरसेविका मानसी लोळगे यांनी केलेल्या या विशेष पाठपुराव्याबद्दल परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

थोडे नवीन जरा जुने