BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

कोल्हापुरात 'सतेज चषक'चा थरार

सतेज चषक २०२६ - फुटबॉल स्पर्धा बातमी

ब्रेकिंग न्यूज: कोल्हापुरात 'सतेज चषक'चा थरार

फुटबॉलचा खेळ आणि सतेज चषक माहिती
4 एप्रिल ते 15 एप्रिल
विजेत्याला २ लाख व मानाचा चषक

कोल्हापुरात चार एप्रिल पासून रंगणार 'सतेज चषक' फुटबॉल स्पर्धा;

स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ, बक्षीसांची लयलूट, आणि शहरात फुटबॉलमय वातावरण

कोल्हापूर - कोल्हापूरच्या क्रीडा संस्कृतीचा कणा असलेल्या फुटबॉल खेळाला नवी झळाळी देण्यासाठी पाटाकडील तालीम मंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 'सतेज चषक २०२६' या जिल्हास्तरीय वरिष्ठ गट पुरुष फुटबॉल स्पर्धेचे बिगुल वाजले आहे. कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ आयोजित ही भव्य स्पर्धा, ४ एप्रिलपासून ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगणार असून १५ एप्रिलपर्यंत फुटबॉल शौकीनांना सामन्यांची मेजवानी मिळणार आहे.

या स्पर्धेच्या नियोजनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मनोहर ठोंबरे आणि कार्याध्यक्ष संदीप सुभाष सरनाईक यांनी सविस्तर माहिती दिली. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या (KSA) मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे अनुभवी पंच काम पाहणार आहेत. स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांच्यातील कौशल्याला वाव देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख २,००,००० रुपये आणि मानाचा 'सतेज चषक' देऊन गौरविण्यात येणार आहे, तर उपविजेत्या संघाला १,००,००0 रुपये व चषक प्रदान केला जाईल.

खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट गोलकिपर, बचावपटू, मध्यफळीतील खेळाडू आणि आघाडी फळीतील खेळाडूंना प्रत्येकी १५,००० रुपयांची आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच'चा किताब दिला जाईल, तर संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूसाठी 'मॅन ऑफ द सिरीज' म्हणून एक विशेष सरप्राईज भेटवस्तू असणार आहे.

स्पर्धेचे वातावरण निर्मितीसाठी शहराच्या विविध मोक्याच्या ठिकाणी खेळाडूंच्या प्रतिमा असलेले १५x२० फुटांचे भव्य बॅनर लावण्यात आले आहेत. छत्रपती शाहू स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारावर खेळाडूंच्या पोस्टरने सजवलेल्या दोन मोठ्या कमानी उभारण्यात येणार असून संपूर्ण परिसर फुटबॉलमय करण्यात आला आहे. स्पर्धेच्या काळात राजकीय क्षेत्रातील दिग्गज, आमदार, खासदार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवणार आहेत.

पत्रकार परिषदेला फुटबॉल विभागाचे अध्यक्ष शरद माळी, फुटबॉल कार्याध्यक्ष संपत जाधव, निवास जाधव, बाळासाहेब निचिते, बाळासाहेब चौगुले, दिपक चौरगे, गणेश विचारे, कमलेश शिंदे, तुषार देसाई, सिध्देश हवळ, तुषार घोरपडे आणि विवेक दळवी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापुरातील तमाम फुटबॉलप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पाटाकडील तालीम मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने