BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापुरात 'सतेज चषक'चा फुटबॉलचा किक ऑफ; प्रॅक्टिस क्लब, वेताळमाळची विजयी सलामी

सतेज चषक २०२६ - न्यूज पोर्टल

कोल्हापुरात 'सतेज चषक'चा फुटबॉलचा किक ऑफ: प्रॅक्टिस क्लब, वेताळमाळची विजयी सलामी

आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; प्रॅक्टिसची 'मर्दानी'वर ७-० ने मात, तर वेताळमाळचा ३-० ने विजय

कोल्हापूर : प्रतिनिधी

क्रीडानगरी कोल्हापूरमध्ये फुटबॉलचा थरार पुन्हा एकदा सुरू झाला आहे. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित अत्यंत प्रतिष्ठेच्या 'सतेज चषक २०२६' फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी अत्यंत दिमाखात पार पडले. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आणि वेताळमाळ तालीम मंडळाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सलामी दिली.

छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते फुटबॉलला किक मारून करण्यात आले. यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, विजय देवणे, रविकरण इंगवले, एकनाथ पाटील, डॉ. धुरत कोटकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाटाकडील तालीम मंडळाच्या वतीने राजेंद्र ठोंबरे, शरद माळी, संदीप सरनाईक यांनी नियोजनाची धुरा सांभाळली.

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा धुव्वादार विजय

स्पर्धेतील सलामीचा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आणि मर्दानी खेळाचा आखाडा यांच्यात झाला. प्रॅक्टिसने तब्बल ७-० अशा मोठ्या गोलफरकाने विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला.

वेताळमाळचे वर्चस्व

वेताळमाळ तालीम मंडळ आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात चुरशीची लढत झाली. वेताळमाळने ३-० असा विजय निश्चित केला.

आजचे सामने

दुपारी १:३० वा.

दिलबहार तालीम मंडळ
वि.
संध्यामठ तरुण मंडळ

सायंकाळी ४:०० वा.

पाटाकडील तालीम मंडळ 'अ'
वि.
रंकाळा तालीम मंडळ

© २०२६ | सतेज चषक - क्रीडानगरी कोल्हापूर

थोडे नवीन जरा जुने