BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

महाराणी ताराबाईंचा उल्लेख 'जैन महाराणी' केल्याने नवा वाद; आचार्य नयन पद्मसागर यांच्या विधानावर संताप

 

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मुघल सत्तेला समर्थपणे अंगावर घेणाऱ्या मराठा साम्राज्याच्या महाराणी ताराबाई यांच्याबद्दल जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. ताराबाई यांचा उल्लेख त्यांनी 'जैन महाराणी' असा केल्याचे एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या हवाल्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, आचार्य नयन पद्मसागर यांनी म्हटले आहे की, "औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे अमानुष हाल केले. त्यानंतर जैन महाराणी तारादेवींचा उदय झाला. औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेला धूळ चारण्याचे महान कार्य जैन महाराणी ताराबाईंनी केले. हा जैन महिलांचा इतिहास आहे."

ऐतिहासिक संदर्भ आणि विरोध:

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, महाराणी ताराबाई या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. त्यांनी औरंगजेबाविरुद्ध सात वर्षे प्रखर लढा दिला. मात्र, त्यांचा संबंध कोणत्याही अर्थाने 'जैन' धर्माशी जोडण्यावर इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. महापुरुषांचे जाती-धर्मात विभाजन करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.

दरम्यान, या विधानाची सत्यता पडताळण्याचे आणि त्यावर अधिकृत स्पष्टीकरण देण्याचे आवाहन दोन्ही बाजूंनी केले जात असून, या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

थोडे नवीन जरा जुने