BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

खंडोबाला नमवून दिलबहार तालीम संघ 'सतेज चषक'च्या अंतिम फेरीत

सतेज चषक फुटबॉल अपडेट

खंडोबाला नमवून दिलबहार तालीम संघ 'सतेज चषक'च्या अंतिम फेरीत

कोल्हापूर फुटबॉलचा महासंग्राम

कोल्हापूर: प्रतिनिधी | १३ एप्रिल २०२६

येथील सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या अटीतटीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने खंडोबा तालीम मंडळावर १-० ने मात करत अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश केला. आता बुधवारी होणाऱ्या महामुकाबल्यात विजेतेपदासाठी वेताळ तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.

पूर्वार्धात फेबिनचा निर्णायक गोल

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, सामन्याच्या १२ व्या मिनिटाला दिलबहारच्या फेबिनने उत्कृष्ट मैदानी गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर खंडोबा तालीम मंडळाने बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र दिलबहारच्या बचावफळीने त्यांना रोखून धरले.

पंचांच्या निर्णयावरून मैदानावर तणाव

सामन्यादरम्यान खंडोबा तालीम मंडळाकडून एक गोल डागण्यात आला होता, परंतु पंचांनी तो 'ऑफ साईड' असल्याचे घोषित केले. या निर्णयावर खंडोबाच्या खेळाडूंनी आणि समर्थकांनी आक्षेप घेतल्याने मैदानावरील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. अखेर खंडोबा तालीम मंडळाने खिलाडूवृत्ती दाखवत पंचांचा निर्णय मान्य केला.

उत्तरार्धात बचावफळीची भिंत

मध्यंतरानंतर दिलबहार तालीम मंडळाने आपली रणनीती बदलत बचावात्मक खेळावर भर दिला. दिलबहारच्या बचावफळीने खंडोबाचे चढाईचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. खंडोबाकडून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन झाले, मात्र त्यांना गोल नोंदवण्यात यश आले नाही.

सामन्याचा निकाल

दिलबहार
1
VS
खंडोबा
0
सामनावीर: लम्खोलीन डोंजील
आजच्या सामन्यातील खेळाडू
दिलबहार तालीम
स्वयम साळोखे प्रथम भासले थांगलेन संकेत वेसनेकर सुशांत अतिग्रे सोहम गिराजे
खंडोबा तालीम
प्रभू पोवार रोहित जाधव लायकर कुणाल दळवी विष्णू पृथ्वीराज साळोखे प्रताप E
फायनल अपडेट!

मंगळवारी सुट्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त)


अंतिम सामना: बुधवारी (१५-०४-२०२६)

वेताळ तालीम VS दिलबहार तालीम

वेताळ की दिलबहार? कोण होणार सतेज चषकाचा मानकरी?

© २०२६ सतेज चषक फुटबॉल स्पर्धा - सर्व हक्क राखीव

थोडे नवीन जरा जुने