कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने 'अग्निशमन सेवा दिन' साजरा
कोल्हापूर: सन १४ एप्रिल १९४४ या दिवशी एस.एस. फोर्ट स्टिकींग जाहजला विक्टोरीया डॉक मुंबई बंदरावर भिषण आग लागली होती. ती आग विझवताना अग्निशमनाचे ६६ जवान शहीद झाले, यांच्या बलिदानाबद्दल अग्निशमन सेवा दिन व सप्ताह साजरा करण्यात येतो.
महापालिकेच्यावतीने सासने मैदान, फायर स्टेशन येथे अग्निशमन सेवा दिनानिमित्त अग्निशमन सेवा बजावत असताना प्राणाची आहुती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानवंदना, श्रद्धांजली व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी महापौर रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. या कार्यक्रमात फायर गीत व श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता मुर्लीधर जाधव, नगरसेवक विशाल चव्हाण, नगरसेविका दिपाली घाटगे, स्वाती कांबळे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी दस्तगीर मुल्ला, ओंकार खेडकर, जयवंत खोत, कांता बांदेकर अग्निशमन दलाचे जवान व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅली काढली. रॅलीचा मार्ग खालीलप्रमाणे होता:
ही रॅली अग्निशमन गाडी व दुचाकीवरून काढण्यात आली होती, ज्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.