BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

शिंगोशी मार्केट परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा 60 वर्षांचा प्रवास सन्मानित - अपार कष्ट, वक्तशीरपणाला मानवंदना

वृत्तपत्र विक्रेता सन्मान सोहळा - Digital News Katta
कोल्हापूर न्यूज

शिंगोशी मार्केट परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा 60 वर्षांचा प्रवास सन्मानित - अपार कष्ट, वक्तशीरपणाला मानवंदना

कोल्हापूर : ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता वर्षभर सातत्याने घरपोच सेवा देणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे अपार कष्ट आणि वक्तशीरपणा हा समाजातील प्रत्येकाला यशस्वीतेसाठी आदर्शवत व वंदनीय आहे, असे भावस्पर्शी हितगुज हृदयस्पर्श परिवाराचे संस्थापक पद्माकर कापसे यांनी काढले.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, कोल्हापूर शाखा आणि जायरस ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटी यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र विक्री व्यवसायात 60 वर्षे पूर्ण केलेल्या शिंगोशी मार्केट परिसरातील प्रकाश बेनाडे, जयवंत कांबळे आणि श्रीमती सुवर्णा सुगंध पगारे यांचा शाल, श्रीफळ व गुलाब रोप देऊन सन्मान करण्यात आला.

सन्मान कोणाच्या हस्ते झाला?
यांचे सत्कार चौंडेश्वरी कोष्टी समाजाचे अध्यक्ष मोहन हजारे, हिंदू जनजाग्रुती च्या डॉ. अश्विनी माळकर, प्रा. तानाजी पाटील, बबीता जाधवअनिता काळे यांचे हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय सचिव तेजस राऊत यांनी स्वागत करताना सांगितले की, “वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान अमूल्य असून त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्यासाठी भविष्यात व्यापक योजना राबवण्यात येतील.” तर डॉ. अश्विनी माळकर यांनी महिलांच्या या क्षेत्रातील स्थानाबद्दल अभिमान व्यक्त केला.

प्रमुख मान्यवरांचे विचार:
  • प्रकाश बेनाडे: हा सन्मान आमचा उत्साह अधिक वाढवणारा आहे.
  • प्रा. तानाजी पाटील: मीडियासाठी रचनात्मक प्रकल्प राबवण्याची घोषणा.
  • राजेंद्र मकोटे (संयोजक): अक्षय तृतीया, शिवजयंती आणि बसव जयंती या तिहेरी योगायोगाचा दिवस प्रेरणादायी.
  • अजित ठाणेकर (माजी नगरसेवक): महानगरपालिकेच्या माध्यमातून भक्कम पाठबळ देण्याचे आश्वासन.

कार्यक्रमास नंदकुमार मकोटे (संचालक, राजश्री शाहू अर्बन बँक) तसेच माजी नगरसेवक किरण नकाते यांनी शुभेच्छा दिल्या. आयोजनासाठी जायटस च्या वैशाली कांबळे, विशाखा शेट्टी, राजाराम मटकरे, सागर ठाणेकर, राम मकोटे आणि सुनील समडोळीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


विशेष गौरव: यावेळी पद्माकर कापसे यांना त्यांच्या सांस्कृतिक, नाट्य संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल वाढदिवसानिमित्त अजित ठाणेकर यांच्या हस्ते शाल अर्पण करून शुभेच्छा देण्यात आल्या.

डिजिटल न्यूज कट्टा - तुमची बातमी, आमची जबाबदारी
थोडे नवीन जरा जुने