BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'बेस्ट आउटगोइंग स्टुडंट' पुरस्कारांचे वितरण

कोल्हापूर : येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संगणक अभियांत्रिकी विभागातील अथर्व शशिकांत शिंदे आणि तन्वी जयवंत पाटील यांची या वर्षाचे 'बेस्ट आउटगोइंग स्टुडंट' म्हणून निवड करण्यात आली.


या विद्यार्थ्यांची निवड केवळ गुणांवर आधारित नसून, त्यांची मागील तीन वर्षांतील शैक्षणिक कामगिरी, क्रीडा क्षेत्रातील सहभाग, सामाजिक कार्य आणि प्रत्यक्ष मुलाखत याद्वारे करण्यात आली. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते या विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

विभागीय पुरस्कारांचेही वितरण

मुख्य पुरस्कारांसोबतच प्रत्येक विभागातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचाही (Department Best Outgoing Student) गौरव करण्यात आला. यामध्ये खालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे:

सुतेज सुशांत शेटगे (सिव्हिल विभाग)

साहिल संजय गोडे (मेकॅनिकल विभाग)

पार्थ सागर जाधव व राही राहुल पाटील (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग)

आर्यन शिवाजी खोत (कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग)

विशेष सन्मान

कार्यक्रमात इतरही महत्त्वाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 'बेस्ट हिरकणी' म्हणून मृणाल सागर चौगुले हिचा गौरव झाला, तर 'पॉली प्रिन्स' म्हणून हर्षवर्धन रणनवरे व पृथ्वीराज ढवण आणि 'पॉली प्रिन्सेस' म्हणून अर्पिता पाटील व पूर्वा तोडकर यांना सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याला उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणुके, विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. के. शिंदे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. शीतल साळोखे आणि प्रा. अजय बंगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राज अलास्कर यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने