BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

पंचगंगा स्मशानभूमीत 'जादू ग्रुप'तर्फे शेणी दान उपक्रम संपन्न

कोल्हापूर: प्रतिनिधी

सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत, येथील 'जादू ग्रुप'च्या वतीने पंचगंगा स्मशानभूमी येथे 'शेणी दान' उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाद्वारे स्मशानभूमीतील इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी ग्रुपच्या वतीने मोलाचे योगदान देण्यात आले.


या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे 'जादू ग्रुप'चे लहानांपासून थोरांपर्यंत सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्याची आवड आणि निस्वार्थ सेवेची भावना उराशी बाळगून सर्व सदस्यांनी या श्रमदानात आणि दान उपक्रमात सहभाग नोंदवला.


स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी लाकडांसोबतच शेणींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. इंधनाची ही गरज ओळखून जादू ग्रुपने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. यावेळी बोलताना ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले की, "समाजाप्रती आपले काही देणे लागते, याच भावनेतून आम्ही वेळोवेळी अशा उपक्रमांचे आयोजन करत असतो. आजच्या उपक्रमात बाल सदस्यांच्या सहभागामुळे त्यांनाही सामाजिक कार्याची गोडी लागेल."

या उपक्रमाचे पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील नागरिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून कौतुक होत आहे. 'जादू ग्रुप'च्या या पुढाकारामुळे सामाजिक कार्याचा एक नवा आदर्श समोर आला आहे..

थोडे नवीन जरा जुने