BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

राजेश चषक फुटबॉल: जुना बुधवारला नमवून 'दिलबहार' उपांत्य फेरीत दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी): जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आणि भगिनी मंच यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय 'राजेश चषक' फुटबॉल स्पर्धेत आज रंगलेल्या अटीतटीच्या उपांत्यपूर्व सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने जुना बुधवार पेठ संघावर २-० अशा गोलफरकाने मात केली. या विजयासह दिलबहार संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.


सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तोडीस तोड खेळ झाल्यामुळे पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात अपयश आले आणि सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. मात्र, उत्तरार्धात दिलबहारच्या खेळाडूंनी अधिक समन्वय दाखवला.

सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला थुलुंगाने दिलेल्या अचूक पासवर स्वयम् साळोखेने चेंडूला जाळीचा मार्ग दाखवत दिलबहारला १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. पिछाडीवर पडलेल्या जुना बुधवार संघाने बरोबरीसाठी प्रयत्न केले, परंतु त्यांना दिलबहारची बचावफळी भेदता आली नाही.

सामन्याच्या ८० व्या मिनिटाला जुना बुधवारच्या 'डी' क्षेत्रात दिलबहारच्या खेळाडूला धोकादायक पद्धतीने अडवल्यामुळे पंचांनी दिलबहारला 'पेनल्टी' बहाल केली. या सुवर्णसंधीचा फायदा घेत थुलुंगाने गोल केला आणि दिलबहारची आघाडी २-० अशी भक्कम केली.

दिलबहार संघाकडून प्रीतम भोसले, थुलुंगा, सार्थक मगदूम, फेबीन आणि स्वयम् साळोखे यांनी उत्कृष्ट खेळ केला. जुना बुधवार संघाकडून मयूर सुतार, संकेत कांबळे, प्रथमेश जाधव, सचिन मोरे आणि शुभम जाधव यांनी झुंजार प्रयत्न केले. दरम्यान, जुना बुधवारचा खेळाडू संकेत जाधव याला दोन पिवळी कार्डे (येलो कार्ड) मिळाल्याने त्याचे रेड कार्डमध्ये रूपांतर झाले आणि त्याला मैदान सोडावे लागले.

शेवटपर्यंत आघाडी टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या दिलबहार संघाने या विजयासह अंतिम फेरीत जाण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

थोडे नवीन जरा जुने