BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

बालिंगा येथे दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा थरार; ब्रेक फेल झाल्याने तीन दुचाकींसह डिजिटल बोर्डाला धडक

 कोल्हापूर (प्रतिनिधी):

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा (ता. करवीर) येथे आज सकाळी दूध वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात तीन दुचाकी, विजेचा डिजिटल बोर्ड आणि पाण्याच्या टाक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी वाहनांचा मात्र चक्काचूर झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पाटील (वय २७, रा. भामटे) हे दूध संघात दूध घालून टेम्पोने कोल्हापूरहून कळंबे तर्फ कळेकडे जात होते. सकाळी बालिंगा परिसरात आले असताना अचानक टेम्पोचा ब्रेक फेल झाला. वाहन नियंत्रणाबाहेर गेल्याचे लक्षात येताच चालक संतोष पाटील यांनी प्रसंगावधान राखले. रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी त्यांनी टेम्पो झाडाच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला.

या प्रयत्नात भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला असलेला विजेचा डिजिटल बोर्ड, विक्रीसाठी ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या आणि तिथे उभ्या असलेल्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यानंतर टेम्पो एका झाडावर जाऊन धडकला. या धडकेत टेम्पोच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात भाऊ सुतार, सुलतान शेख आणि अकबर शेख यांच्या दुचाकींचेही नुकसान झाले आहे.

अपघातानंतर गगनबावडा मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, या मार्गावर दूध पोहोचवण्याच्या घाईत अनेक टेम्पो भरधाव वेगाने धावतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. अशा अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

थोडे नवीन जरा जुने