BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात; महापौर व आयुक्तांकडून कामाची पाहणी

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी व नूतनीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी आज सकाळी महापौर सौ. रुपाराणी निकम आणि महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी केली. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, गटनेत्या सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ आणि शहर अभियंता रमेश मस्कर उपस्थित होते.


८ ऑगस्ट २०२४ रोजी लागलेल्या आगीत या नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर महानगरपालिकेने युद्धपातळीवर पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले. यावेळी बोलताना महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील कामे उत्तमरीत्या पूर्ण झाली असून उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी सन २०२४-२५ अंतर्गत २५.१० कोटी रुपये निधी मंजूर झाला असून, त्यापैकी १२.५५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

कामाचा सद्यस्थिती अहवाल:

पहिला टप्पा: भिंतींचे ग्राऊटींग, गिलावा, छताचे ट्रस व गर्डर निर्मिती आणि कमकुवत भिंतींचे काम पूर्ण झाले आहे.

दुसरा टप्पा: ग्रीन रूम, व्ही.आय.पी. रूम, दरवाजे व खिडक्यांचे काम पूर्ण झाले असून, बाल्कनी व कलादालन जिन्यांची कामे सुरू आहेत. हे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.

तिसरा टप्पा: स्टेज, ए.सी. यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा आणि पॅनलिंगचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे.

चौथा टप्पा: स्टेज लाईटिंग, ऑडिओ सिस्टीम, कार्पेट आणि बैठक व्यवस्थेचे नमुने रंगकर्मींसमोर सादर करून अंतिम करण्यात आले असून त्याचे काम सुरू आहे.

याशिवाय, खासबाग कुस्ती मैदानाच्या तटबंदीची दुरुस्ती, नवीन पार्किंग इमारत आणि इतर पायाभूत सुविधांसाठी ३५ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नगर विकास विभागाकडे करण्यात आली आहे. प्रशासनाकडून या निधीचा पाठपुरावा सुरू असून, हे सर्व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

या पाहणी दौऱ्यावेळी शाखा अभियंता सुरेश पाटील, नाट्यगृह व्यवस्थापक समीर महाब्री, विविध ठेकेदार कंपन्यांचे प्रतिनिधी आणि किरण चव्हाण, आनंद काळे, प्रसाद जमदग्नी यांसारखे मान्यवर रंगकर्मी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने