BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापुरात ८ मार्चला महिला डॉक्टरांसाठी 'विशेष सीएमई'चे आयोजन

 कोल्हापूर:  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (GPA), कोल्हापूर आणि नोव्हा आयव्हीएफ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ८ मार्च रोजी विशेष 'सीएमई' (वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम) व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती नुकतीच पत्रकार परिषदेत देण्यात आली.


हॉटेल वृषाली येथे दुपारी १:३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. स्त्री शक्तीचा सन्मान आणि महिला डॉक्टरांच्या वैद्यकीय ज्ञानातील अद्ययावत माहितीसाठी (Knowledge Update) हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये तीन प्रमुख सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्या सत्रात नोव्हा आयव्हीएफ सेंटरचे मुख्य सल्लागार डॉ. इंद्रनील जाधव हे 'वंध्यत्व निवारण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान' या विषयावर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या महिला सर्जन डॉ. आशा जाधव या 'नारी इच्छाशक्ती, कर्तृत्व आणि साफल्य' या विषयावर आपले अनुभवपर विचार मांडतील. तर तिसऱ्या सत्रात सीपीआर रुग्णालयातील बालरोग विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. महेश्वरी जाधव या 'बालसंगोपन: माता आणि तज्ज्ञांच्या नजरेतून' या विषयावर सविस्तर माहिती देतील.

या कार्यक्रमाचे नियोजन जीपीए अध्यक्षा डॉ. वर्षा पाटील, सचिव डॉ. राजेश सोनवणे आणि खजिनदार डॉ. दीपक पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पत्रकार परिषदेला डॉ. आशा जाधव, डॉ. वर्षा पाटील, डॉ. महेश्वरी जाधव, डॉ. इंद्रनील जाधव, सचिव डॉ. राजेश सोनवणे, खजिनदार डॉ. दीपक पोवार, नोव्हा केंद्र प्रमुख मुझ्झमील पाटील आणि सेल्स प्रमुख प्रमोद माशाळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला डॉक्टरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने