BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

राजेश चषक फुटबॉल: संकेत साळोखेची हॅट्रिक; श्री शिवाजी तरुण मंडळ उपांत्य फेरीत

कोल्हापूर:

जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आणि भगिनी मंच यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज श्री शिवाजी तरुण मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा ३-१ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. या चुरशीच्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाच्या संकेत साळोखेने शानदार हॅट्रिक नोंदवत स्पर्धेतील पहिली हॅट्रिक करण्याचा मान पटकावला.


सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी वेगवान खेळाचे प्रदर्शन केले. पूर्वार्धात ६ व्या मिनिटाला हर्ष जरगच्या पासवर संकेत साळोखेने हेडरद्वारे पहिला गोल करून शिवाजी मंडळाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २७ व्या मिनिटाला इंद्रजीत चौगुलेच्या पासवर पुन्हा एकदा संकेतने हेडरद्वारे गोल करत ही आघाडी २-० अशी भक्कम केली. प्रॅक्टिस क्लबनेही जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. ३१ व्या मिनिटाला केवळ कांबळेच्या पासवर सुजित एस. याने हेडरद्वारे गोल करत पिछाडी २-१ अशी कमी केली.

उत्तरार्धात दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंनी जिगरबाज खेळ करत बरोबरीसाठी प्रयत्न केले, मात्र ६६ व्या मिनिटाला संकेत अनिल साळोखेच्या पासवर संकेत नितीन साळोखेने तिसरा गोल नोंदवत आपली हॅट्रिक पूर्ण केली आणि संघाचा विजय निश्चित केला. शिवाजी तरुण मंडळाकडून यश जांभळे, संकेत जरग आणि इंद्रजीत चौगुले यांनी उत्कृष्ट खेळ केला, तर प्रॅक्टिस क्लबकडून अजिंक्य नलवडे, सूरज जाधव, सचिन गायकवाड, साहिल डकरे आणि सुजित एस. यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या संकेत नितीन साळोखेला 'सामनावीर' म्हणून गौरविण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने